बसचे
हेलकावे
खाणे,
उधळणे
आता
सवयीचे
झाले
होते.
माझ्यापाशी
माझ्या
कपड्यालत्त्यांनी
भरलेली
एक
व्हीआयपी
कंपनीची
ब्रिफकेस
होती.
भक्कम
बनावटीची
व
जड
अशी.
मी
ड्रायव्हरपासून
दुसऱ्या
बाकड्यावर
बसलो
होतो.
माझ्या
डोक्यावरच्या
जाळीदार
कॅरीयरवर
बॅग
ठेवलेली
होती.
गाडी
चढाला
लागली
तशी
बॅग
घरंगळत
मागे
गेली
आणि
वळण
व
खड्डा
यामुळे
खाली
पडली.
पडली
ती
त्या
बाकड्यावरच्या
एका
मध्यमवयीन
मातेच्या
कपाळावर!
त्या
बॅगेच्या
अॅल्युमिनियमने
वेढलेला
कोपरा
कपाळाला
दाणदिशी
लागून
बॅग
खाली
पडली.
त्या
आवाजाने
मी
क्षणार्धात
वर
पाहिले
तर
बॅग
दिसली
नाही,
दुसऱ्या
क्षणार्धात
मागे
पाहिले
तर
बॅग
खाली
पडलेली.
ज्या
मातेच्या
कपाळाला
लागली
तिने
डोळे
मिटलेले
व
कपाळाला
स्वाभाविकपणे
हात
लागलेला.
मी
मावशी,
मावशी
अशी
हाक
मारतो
तर
होकार
मिळेना.
दुसरे
प्रवासी
धावून
आले.
तेही
हाका
मारत
राहिले.
ती
माता
मूर्च्छित
झाली
होती.
मी
घाबरलो.
एका
महिलेने
वारा
घातला.
जरा
वेळाने
ती
माता
शुद्धीवर
आली.
तिच्या
कपाळावर
भलेमोठे
टेंगूळ
आले
होते.
मी
क्षीण
आवाजात
म्हटले,
‘मावशी
माफ
करा’.
त्या
शांतपणे
म्हणाल्या,
‘भाऊ
तू
काही
माझ्या
कपाळाच्या
दिशेने
तुझी
बॅग
मारून
नाही
फेकली.
वाईट
वाटून
नको
घेऊ.’
काय
म्हणावं
या
मनाला?
सगुणातील
निर्गुण.
बोध
घेतला
सार्वजिनक
जागी
कोणी
जाणता-अजाणता
वाईट
केलं
तरी
संयम
राखून
माफ
करायचं.
- डॉ.
दिलीप
धोंडगे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट