Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 32

आत्मजागृती

$
0
0

आजचा रोजचा दिवस नवा करणे ही जगण्यातील अर्थपूर्ण बाब होय. तेच ते आणि तेच ते असे जगणे अर्थपूर्ण नसते हे उघडच आहे. ‘बेकंबेचे तेच परोचेअसे मर्ढेकरांनी म्हटलेले आहे. तुकोबांनी दिवस नवा असण्याबरोबर जागृतीचा असावा असे म्हटले आहे. जागृतीचा म्हणजे स्वत्व प्रकाशन करणारा असावा. यासाठी मनावर अंकुश असायला हवा. निश्चयाने जगणे झाले मनाला आवर घातला, तर आत्मजागृती होऊ शकते. मानदंभाची आटी संपली तर आत्मजागृती संभवते. आत्मजागृती अनुभवणे हा फार उच्च स्वरूपाचा अनुभव होय. असा अनुभव सातत्याने मिळवत जगणे झाले तर ते अर्थघन होण्याची शक्यता बळावते.

आयुष्याचे गणित सूक्ष्मपणे लक्षात घेतले तर ते फार मनोरंजक आहे. वय वाढत जाते तसे आयुष्य घटत जाते. बेरीज आणि वजाबाकी ही महत्त्वाची चिन्हं आहेत. आयुष्यात अनुभवांची उतरंड उभी राहणं ही बेरीज आहे; आयुष्य चंद्रकलांप्रमाणे सरत जाणं ही वजाबाकी आहे. वद्यपक्षाला शुक्लपक्ष मानणं यात माणसाचं समाधान सामावलेलं आहे हे खरं; पण आत्मजागृतीसाठी आयुष्याचा गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे. आत्मजागृतीमुळे अनुभव येतात. जगण्यासंबंधीचे यच्चयावत प्रश्न हे अनुभवस्वरूप असतात. आत्मजागृतीविना जगणाऱ्याला अनुभव कसे येणार ? एकाच अनुभवाचा कित्ता गिरविला जात असेल तर त्याला अनुभवसंपन्न कसे म्हणता येईल? अनुभवसंपन्नता ही प्रगतीकडे नेणारी बाब आहे. माणूस आणि प्रगती हे सनातन नाते आहे. शतकामागून शतके जाताहेत. शतकातील माणसांची प्रगतीही लक्षणीय विनटलेली दिसते आहे. भौतिक संपन्नतेच्या संदर्भात ही प्रगतीची प्रसादचिन्हे कोणाही नाकारणार नाही. पण माणूस पक्ष्यासारखा आकाशात भराऱ्या मारायला शिकला, माशासारखा पाण्यात पोहायला शिकला, पण माणसाशी माणसासारखा वागायला शिकला नाही, असे कुणा तत्त्ववेत्याला म्हणावंसं का वाटावं ? किंवामानसा मानसा कधी व्हशील रे मानूसअसं बहिणाबाई चौधरींना माणसालाच प्रश्न विचारावा का वाटला? ही बाब अर्थातच बाह्यवाढ आंतरिक वाढ यांच्याशी निगडित आहे.

भौतिक संपन्नतेत लोळणाऱ्या माणसाची चिंता ही भौतिक संपन्नता ही आहे. आध्यात्मिक संपन्नतेत मग्न असणारा माणूस स्वानंदसुखनिवासी आहे. भौतिक संपन्नता, विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञानाने येणारी, मानवी जीवन सुखी संपन्न करण्यासाठी आवश्यक आहे. पण तेवढेच सुख पुरेसे नाही त्या सुखाचा अतिरेक हा तर अनावश्यच आहे. आत्मबोधाने येणारी आत्मजागृती तज्जन्य सुख हे मानवकल्प करणारे असते. आत्मजागृतीमुळे मनाची समाधान अवस्था होते. भेद, विकल्प, विषमता अशा द्वंद्वात्मक गोष्टी गळून पडतात भौतिक आत्मिक यांचे संतुलन साधले जाते. सगुणनिर्गुणाचे मूर्तामूर्त स्वरूप एकाकार होते.

- डॉ. दिलीप धोंडगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 32


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>