कर्माचे
निमित्त
होणे
हा
सगुणाचा
भाग
होय.
पण,
कर्माचा
धनी
झाला
की
सगुण
तर
हरपतेच
पण
निर्गुण
दृष्टिक्षेपातही
येत
नाही.
नैतिक
सत्यातच
पारमार्थिक
सत्य
दडलेले
असते.
सगुण-निर्गुणाचे
संतुलन
हे
पारमार्थिक
सत्य
होय.
ज्याच्या
ज्याच्या
वाट्याला
जी-जी
कर्मे
येतात
ती
परमेश्वरार्पण
करणे
म्हणजे
त्या
सगुणात्मक
कर्मांना
निर्गुणात्मक
करणे
होय.
समाजस्वास्थ्यासाठी
हा
विचार
समाजात
रुजविणे
फार
आवश्यक
आहे.
या
विचारामुळे
सर्व
कर्मांना,
म्हणजे
सर्व
व्यवसायांना,
समानता
प्राप्त
होते
व
ही
सर्व
कर्मे
समाजोन्नतीसाठी
सारखीच
महत्त्वाची
असतात,
हा
विचार
दृढमूल
होतो.
कर्मांच्या
श्रेष्ठ-कनिष्ठतेमुळे
कर्मांसंबंधी
अहंगंडात्मक
तसेच
न्यूनगंडात्मक
भावना
निर्माण
होतात.
तथाकथित
श्रेष्ठ
कर्मे
आचरणारी
माणसं
अहंगंडाने
पछाडली
जाऊन
ती
अतिरिक्त
प्रतिष्ठेची
मागणी
करतात
व
तथाकथित
कनिष्ठ
कर्मं
आचरणारी
माणसं
आपली
कर्मे
समाजासाठी
आवश्यक
असूनही
कनिष्ठ
लेखली
जातात;
त्यामुळे
न्यूनगंडाने
पछाडली
जातात.
परिणामतः
समाजनामक
एकविध
घटितात
विषमतेची
फूट
निर्माण
होते.
विषमताग्रस्त
समाज
आपले
स्वास्थ
स्वाभाविकपणे
मग
गमावून
बसतो.
मुद्दा
असा
की,
आपली
नित्यनैमित्तिक
कर्मे
समाजासाठी
आवश्यक
व
आपल्या
चरितार्थासाठी
आवश्यक
असतात.
त्यांचे
आचरण
केवळ
स्वहितासाठी
न
होता
ते
समाजहितासाठी
व्हायला
हवे.
स्वहितासाठीच
कर्मे
हा
विचार
सगुण
पातळीवरच
रेंगाळतो.
म्हणजे
असे
की
अमुक
हे
कर्म
मीच
केले
हा
बंध
दृढ
होतो.
उलट,
कर्म
केल्यानंतर
त्याचा
उच्चार
न
करणे
इतकेच
नव्हे
तर
त्या
कर्माचा
मानसिक
पातळीवर
संन्यास
घेणे
हा
मोक्षानुभव
ठरतो.
माणसाच्या
जगण्याच्या
बाबतीत
व
सामाजिक
संदर्भात
सगुण-निर्गुणाचा
विचार
फारच
उदबोधक
ठरू
शकतो.
साधीसाधी
माणसं
ज्या
निष्काम
भावनेने
कर्म
आचरतात
व
त्यांच्या
कृतींमधून
जो
निर्गुणाचा
बोध
होतो
ती
उदाहरणेही
यथाक्रम
पाहावयाची
आहेत.
- डॉ.
दिलीप
धोंडगे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट