नेहमीप्रमाणे मी मोटरसायकलने कॉलेजला जात होतो. एका छोट्याशा वळणाजवळ एक कुत्र्याचं पिलू मध्येच आलं. मी वेगात नसल्यामुळे गाडीचा वेग नियंत्रित केला. तरीही त्या पिलाला पुढच्या चाकाचा किंचितसा धक्का लागला. ते कळवळलं. मी गाडी थांबवून त्याला जखम झाली का ते न्याहाळलं. पण जखम झालेली दिसली नाही.
↧